सत्कारामुळेच कलावंत जगासमोर : बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

मंगला बनसोडे, मनीषा साठे यांचा सत्कार सोहळा

पुणे: "व्यवहारापलीकडे जाऊन कलेवर प्रेम करणारे कलावंत कष्टकरी असतात. त्याची कला ते प्रामाणिकपणे सादर करत असतात अशा कलावंताची दखल सरकार घेत असतं आणि त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करतात. त्यामुळे कष्टकरी कलावंत जगासमोर येतात,'' असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी व्यक्त केले.

नटरंग ऍकॅडमी, नृत्य परिषद महाराष्ट्र, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद पुणे शाखा यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बापट यांच्या हस्ते "राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या' लोककलावंत मंगला बनसोडे व "पं. रोहिणी भाटे पुरस्कार'प्राप्त कथक नृत्यांगना मनीषा साठे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, शाहीर हिंगे प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, नटरंग ऍकॅडमीचे संस्थापक-संचालक जतीन पांडे, नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर, स्वाती दातार उपस्थित होते. ईश्‍वरी थिगळे हिने सादर केलेल्या लावणीने कार्यक्रमाला सुरवात झाली.

बनसोडे म्हणाल्या, ""मला पुरस्कार मिळाल्यानंतर पहिलाच सन्मान पुण्यात झाला हे माझे भाग्यच आहे. कलावंत आणि कलेची पावती या पुरस्कारामुळे मिळाली आहे. हा पुरस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लोककलावंताचा आहे.'' साठे म्हणाल्या, ""जगातल्या सर्व नर्तनचा मूळ हा शास्त्रीय नृत्य आहे. नृत्य हा सुलभ प्रकार असून विपरीत वातावरणाला तोंड देत कला सादर करून स्वतःला सिद्ध करावा लागते.''

राजेभोसले म्हणाले, ""लोककलावंत विविध समस्यांना तोंड देत नृत्यसेवा करतात. अशा कलावंताचा सन्मान केले पाहिजे.'' शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: pune news mangla bansode manisha sathe homage bapat