मराठीला अभिजात दर्जा द्या; 'मसाप'ची दिल्लीत घोषणा

सुशांत सांगवे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यामुळे साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रसरकार ला सद्सद्विवेकबुद्धी द्यावी, यासाठी प्रार्थना केली. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, 'मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, लेखक राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबळेकर यांच्यासह अनेक मराठीप्रेमी या वेळी उपस्थित होते.

Web Title: pune news marathi langauge and maharashtra sahitya parishad in delhi