माजी महापौर दिवाकर खिलारे यांचे हृदयविकाराने निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पुणे - माजी महापौर आणि पुणे विद्यार्थी गृहाचे माजी अध्यक्ष दिवाकर ऊर्फ भाऊसाहेब खिलारे यांचे शनिवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, चार मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. खिलारे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

महापालिकेच्या १९६८च्या निवडणुकीत खिलारे अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी १९८६च्या सुमारास काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर १९९१च्या महापौरपदाच्या निवडणुकीत खिलारे यांनी बंडखोरी केली. तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेवाळे यांचा पराभव करून खिलारे महापौर झाले. मात्र, त्यानंतर त्यांनी निवडणूक लढविली नाही. याचकाळात खिलारे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्षपदही भूषविले.

Web Title: pune news mayor divakar khilare death