त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेची अंमलबजावणी - मेधा कुलकर्णी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - "मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील बॅंका, टपाल, केंद्र शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा वापराच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवांपासून वंचित राहावे लागते. त्यासाठी त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषा वापराची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 1 ते 15 जानेवारी दरम्यान "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंमलबजावणीसाठी बैठक झाली. या वेळी मराठी भाषा समिती प्रमुख आमदार कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, सहायक भाषा संचालक विजया लोणीकर, अनिल गोरे व पुणे शहरातील बॅंका, टपाल (पश्‍चिम, ग्रामीण, शहर), आयकर कार्यालय, आकाशवाणी, अणुविकास संस्था तसेच इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी शासकीय व सार्वजनिक कामकाजात मराठी भाषा व देवनागरी भाषेचा वापर अनिवार्य करण्याबाबतचा कायदा समजावून सांगण्यात आला. मराठी प्रतिशब्द माहिती करून देण्याबाबत उपस्थितांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मराठी भाषा समितीच्या प्रमुख आमदार कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले.

Web Title: pune news medha kulkarni marathi