Pune News : कवठे येमाई येथे 'सुखोई'चा मेटल पार्ट (धातूचा भाग) सापडला

वायुसेनेचे पथक व पोलीसांकडून शोध मोहीम सुरू होती.
pune
punesakal

पाबळ - कवठे येमाई (ता.शिरूर) गावच्या हद्दीत गांजेवाडी येथे सुखोई विमानाचा ६०-७० फूट लांबीचा पाइप सदृश धातूचा भाग (मेटल पार्ट) मंगळवारी (ता.१७) दुपारी १२ च्या सुमारास सरावादरम्यान पडल्याची घटना घडली.

कवठे येमाई, गांजेवाडी, फाकटे परीसरात हा धातूचा भाग शोधण्यासाठी मंगळवारी वायुसेनेचे पथक गावात दाखल झाले. वायुसेनेचे पथक व पोलीसांकडून शोध मोहीम सुरू होती. अंधार पडल्याने व परिसरात बिबट्याची दहशत असल्याने शोध मोहीम तुर्तास थांबवून बुधवारी (ता.१८) पहाटे

सकाळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलिस कर्मचारी, पोलीस पाटील व वायुसेनेच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू केली असता हा धातूचा भाग कवठे गावाच्या हद्दीत गांजेवाडी येथे सापडला आहे.

pune
Pune Crime : हॉटेलमध्ये जास्त वेळ बसल्याने पुण्यात ग्राहकाला दांडक्याने मारहाण, डोक्यात फोडली बाटली; तिघांना अटक

निर्जन ठिकाणी हा भाग पडल्याने कोणतीही हानी झाली नाही. सोशल मीडियावर या घटनेची माहिती पसरल्याने स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. शोध मोहीमेमध्ये कवठे येमाई परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. सदर घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी वायुसेनेकडून देण्यात आलेल्या नंबरवर संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com