"मेट्रो'च्या तीन भूमिगत स्थानकांच्या आरेखनात बदल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - मेट्रोच्या शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट येथील स्थानकांच्या प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मार्ग नव्याने आखले आहेत. खासगी जागांचा तिढा सोडविण्यासाठी हे बदल झाले आहेत, असे महामेट्रोने सोमवारी स्पष्ट केले. 

पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गात हे बदल झाले आहेत. या मार्गावर स्वारगेट, मंडई आणि शनिवारवाडा येथे मेट्रोची भूमिगत स्थानके आहेत. त्यात प्रवेश करण्याचे आणि स्थानकांतून बाहेर पडण्याचे मार्ग खासगी जागांतून जात होते. त्या जागांच्या भू-संपादनाचा प्रश्‍न उद्‌भवत आहे. त्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागण्याची चिन्हे होती. त्यामुळे त्या स्थानकांच्या नजीकच्या जागांतून तेथे प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध आहेत, त्यांचा विचार करण्याचे ठरले. त्या जागा शासकीय मालकीच्या असल्यामुळे त्यांचा वापर करणे शक्‍य असल्यामुळे हा बदल झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले. या मार्गाच्या आराखड्यात बदल झालेला नाही. मात्र, तीन स्थानकांसाठी काहीसा बदल झाला आहे. त्यामुळे स्थानकांबाबत पाच-दहा मीटर अंतराचा बदल होईल. तसेच वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मार्गावरील स्थानकांच्या निविदा पुढील आठवड्यात मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर स्थानकांच्या उभारणीस प्रारंभ होईल, असे महामेट्रोच्या सूत्रांनी नमूद केले. 

Web Title: pune news metro