भूमिगत स्थानकासाठी जेधे चौकात पाहणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पुणे - जेधे चौकातील भूमिगत मेट्रो स्थानकासाठी जागा देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. मात्र, स्थानकासाठी किती जागा देता येईल, याची चाचपणी करण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी सायंकाळी येथे पाहणी केली. मेट्रो स्थानकासाठी किती जागा हस्तांतरित करता येईल, हे महापालिका येत्या आठवड्यात निश्‍चित करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. 

कुणाल कुमार यांच्यासह अतिरिक्त नगर अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, भूमी जिंदगी विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत, महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, तसेच अन्य स्थानिक अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. रस्त्यापासून सुमारे 20-22 मीटर खोलवर भूमिगत मेट्रो स्थानक होणार आहे. त्यासाठी महामेट्रोला सुमारे 3 हेक्‍टर जागा लागणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाण्याच्या टाक्‍यांचे बांधकाम सध्या सुरू आहे, त्यामुळे जागा देण्यावर मर्यादा आली आहे. मात्र, याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार आयुक्त आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभाग, विपश्‍यना केंद्र, पीएमपी स्थानक, एसटी स्थानक आदी ठिकाणी पाहणी केली. भूमिगत स्थानकासाठी महापालिकेने जागा देण्याचे तत्त्वतः कबूल केले आहे. मात्र, एकात्मिक 

वाहतूक व्यवस्थेअंतर्गत एसटी आणि पीएमपीलाही सामावून घेण्यासाठी महामेट्रोला चौकातील बाजूचीही जागा लागणार आहे. त्यावरून सध्या चर्चा सुरू आहे. 

प्राथमिक आराखडा तयार 
दरम्यान, महामेट्रोने स्थानकाचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. महापालिका नेमकी जागा किती देणार, यावर अंतिम आराखडा तयार होणार आहे. त्याला राज्य सरकारची परवानगी मिळाल्यावर निविदा मागवून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. त्यासाठी प्रशासकीय पावले वेगाने पडत आहेत. जानेवारीमध्ये जेधे चौकात भूमिगत स्थानकाच्या कामाला प्रारंभ करण्याचा मनोदय महामेट्रोने यापूर्वीच व्यक्त केला आहे. 

Web Title: pune news metro pmc