मेट्रोचे काम अखेर सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पिंपरी - पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील प्रस्तावित मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून गुरुवारी (ता. २५) सुरवात झाली. मेट्रोचा मार्ग ग्रेडसेपरेटरमधून राहणार असल्याने त्याठिकाणी २५० मीटरच्या टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. 

पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचा मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांना जीवदान मिळाले आहे. दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. 

महामेट्रोने पहिल्या टप्प्यात पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचे १०.७५ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्याचे निशिचत केले आहे. कासारवाडी परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना ते पिंपरी आणि रेंजहिल्स अशा दोन्ही बाजूंनी करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले. 

पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रोमार्गावर नऊ स्टेशन्स प्रस्तावित करण्यात आली आहेत. मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्याने सर्व स्टेशन्स वरच्या बाजूला राहणार आहेत. मात्र, मेट्रोला स्टेशन्ससाठी जागेची आवश्‍यकता भासणार असून, त्यासंदर्भात महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ग्रेड सेपरेटरच्या बाजूला असणाऱ्या बीआरटी मार्गावर करण्यात आलेल्या थांब्याचा वापर मेट्रो स्टेशनसाठी होऊ शकतो. मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. मेट्रोचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गाच्या कामाचे कंत्राट हैदराबादमधील एनसीसी या कंपनीला दिले आहे. 

महामेट्रोकडून काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचा दावा केला असला तरी नाशिक फाटा चौकामधील वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्याची चिन्हे आहेत. नाशिक फाटा चौकामधे जे. आर. डी. टाटा पुलाला जोडण्यासाठी दोन पुलांचे काम सुरू आहे. या दोन्ही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच याठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. मेट्रोचे काम तिथपर्यंत येण्याअगोदर महापालिका प्रशासनाने या दोन्ही पुलांचे काम पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: pune news metro work start