दुधाचा दर्जा ‘पावशेरा’ने कमी

योगिराज प्रभुणे
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे - राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून शहरात येणाऱ्या एकूण दुधापैकी २४ टक्के दुधाचा दर्जा कमी आहे, त्यामुळे या दुधात पोषणमूल्य कमी असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाला दिला आहे. यात समाधानाची गोष्ट इतकीच, की आपल्या घरात येणारे दूध असुरक्षित नाही. 

पुणे - राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून शहरात येणाऱ्या एकूण दुधापैकी २४ टक्के दुधाचा दर्जा कमी आहे, त्यामुळे या दुधात पोषणमूल्य कमी असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाला दिला आहे. यात समाधानाची गोष्ट इतकीच, की आपल्या घरात येणारे दूध असुरक्षित नाही. 

पुण्यात दररोज चार लाख लिटर दुधाची मागणी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन पुणे जिल्ह्यात होत नाही. यामुळे शहराच्या शेजारील नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर यांसह बीड आणि उस्मानाबाद येथूनही दररोज पुण्यात दुधाचा पुरवठा होतो. या जिल्ह्यांमधील डेअऱ्यांमध्ये दुधाच्या पिशव्या भरल्या जातात. या पिशव्यांमधील दुधाचे नमुने ‘एफडीए’ने घेतले. १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान घेतलेल्या नमुन्यांमध्ये २४ टक्के दुधाचा दर्जा कमी असल्याची माहिती ‘एफडीए’तून पुढे आली आहे.

दुधाचा दर्जा कमी करणारे घटक
   खाण्याचा सोडा
   धुण्याचा सोडा
   वनस्पती तूप
   मैदा    पीठ
   स्टार्च     ग्लुकोज
   साखर

प्रमाणित दूध
प्रमाण                                म्हैस              गाय 

मिल्क फॅट (स्निग्धांश)         ६ टक्के       ३.२ टक्के 
स्निग्धांशविरहित घनभाग    ९ टक्के       ८.३ टक्के

यामुळे होते दूध असुरक्षित
पोस्टर कलर व युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर

अशी ओळखा दुधातील भेसळ
आयोडिनच्या चाचणीने दुधातील स्टार्च, मैदा, पीठ यांची भेसळ ओळखता येते. ही भेसळ असल्यास आयोडीन टाकल्यास रंग निळा होतो.

पुणेकरांना मिळणाऱ्या दुधाचा दर्जा चांगला राहावा, यासाठी सातत्याने दूध तपासणीची मोहीम हाती घेतली जाते. या वर्षभरात हाती घेतलेल्या मोहिमेतून कमी दर्जा असलेल्यांकडून नऊ लाख २६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

दूध जास्त मिळण्यासाठी गायी, म्हशींना स्टिरॉईड्‌सची इंजेक्‍शन दिली जात आहेत. यामुळे स्टिरॉईडचा अंशही दुधात येतो. हे तपासण्याची यंत्रणा प्रयोगशाळांमध्ये निर्माण करण्यात आली आहे.
- डॉ. सुहास बाकरे, उपसंचालक

Web Title: pune news milk quality