मी संघाच्या शाखेत वाढलेला कार्यकर्ता: दिलीप कांबळे

रमेश मोरे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

गेली २७ वर्षापासुन दापोडी येथील अशोक गृहनिर्माण सहकारी संस्थेचा सुमारे नऊ एकर जमिनीचा न्यायालयीन लढा सर्वसामान्यांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जुनी सांगवी येथे संस्था सभासद व समाज बांधवांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कांबळे पुढे म्हणाले, न्यायालयाचा निकाल सर्वसामान्य जनतेच्या बाजुने लागल्याने गोर गरीब कष्टकरी बांधवांना हक्काचे घर मिळणार आहे.

जुनी सांगवी : मी सर्वसामान्य कुटुंबात वाढलोय. इतरांसारखा गुंठामंत्री किंवा वारसाने झालेला राजकारणी नाही. मी आज मंत्री असलो तरी आज ही मी झोपडपट्टीत राहतो. मी कुणाला घाबरत नाही. कारण मी कधी चुकीच करत नाही. मी संघाच्या शाखेत वाढलेला कार्यकर्ता आहे, असे पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथे दापोडी येथील अशोक गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सुप्रिम कोर्टाने दिलेल्या जागेच्या निकालाबाबत विजयी मेळाव्यात समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळ यांनी म्हटले आहे.

गेली २७ वर्षापासुन दापोडी येथील अशोक गृहनिर्माण सहकारी संस्थेचा सुमारे नऊ एकर जमिनीचा न्यायालयीन लढा सर्वसामान्यांच्या बाजुने सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जुनी सांगवी येथे संस्था सभासद व समाज बांधवांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कांबळे पुढे म्हणाले, न्यायालयाचा निकाल सर्वसामान्य जनतेच्या बाजुने लागल्याने गोर गरीब कष्टकरी बांधवांना हक्काचे घर मिळणार आहे. दोन तपाच्या प्रदिर्घ लढ्यात अनेकांना वाटत होते ती जागा आपल्याला मिळावी. मात्र न्यायवस्थेने कष्टक-यांच्या बाजुने कौल दिल्याने गोर गरीबांना न्याय मिळाला आहे. लवकरच याचे भुमिपुजन करून आगामी वर्षअखेरपर्यंत घराच्या चाव्या समाज बांधवांच्या हाती येतील.यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कांबळे यांनी आपल्या भाषणा दरम्यान सत्तेत असणा-या शिवसेना मित्र पक्षाचीही फिरकी घेतली. ते म्हणाले, तिकडे गुंठामंत्री खुप आहेत. माझ्या पक्षात याचे प्रमाण कमी आहे. यावेळी व्यासपिठावर शिवसेना शहर प्रमुख, राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, संस्था अध्यक्ष बापुसाहेब सुवासे, गिरिश काटे, शरद थोरवडे, हाजीभाई शेख, रमेश गायकवाड, अरविंद ओव्हाळ, बाळासाहेब जावीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित सुवासे यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.शेवाळे गार्डन जुनी सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री विश्राम वैद्य यांनी केले तर आभार बापुसाहेब सुवासे यांनी मानले.

Web Title: Pune news minister Dilip Kamble statement