सिंहगड रस्त्यावरील "त्या' जागेचा ठराव रद्द करा - आमदार मिसाळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पुणे - महापालिकेच्या ताब्यातील सिंहगड रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक 120 (अ), 120 (ब) येथील जागा मूळ जागा मालकाला परत देण्याचा स्थायी समितीने मान्य केलेला ठराव रद्द करावा, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली. ही जागा मूळ मालकाला देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची एक नगरसेविका प्रयत्न करीत असतानाच मिसाळ यांनी ही मागणी केली आहे. 

येथील जागा महापालिकेने सर्व प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतली आहे. मात्र, ती परत देण्याची मागणी मालकाने महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार जागा परत देण्याचा ठराव स्थायी समितीने गेल्या आठवड्यात केला. चुकीच्या पद्धतीने हा प्रस्ताव मान्य केला असून, त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल. त्यामुळे या प्रस्तावाचा फेरविचार करण्याच्या प्रस्तावावर प्रशासनाकडून अभिप्राय घेण्याचा निर्णय स्थायीने मंगळवारी घेतला. 

या पार्श्‍वभूमीवर ही जागा मालकाला देऊ नये, असे मिसाळ यांनी पत्रात म्हटले आहे. महापालिकेने नियमानुसार जागा ताब्यात घेतली आहे. बाजारभावानुसार या जागेची किंमत 250 कोटी इतकी असल्याने जागा मूळ जागा मालकाला परत देण्याचा प्रस्ताव मान्य झाल्यास महापालिकेचे नुकसान होईल. त्यामुळे हा प्रस्ताव आयुक्तांनी रद्द करावा, असेही मिसाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: pune news mla madhuri misal