Pune News : ललित पाटील प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला घेतले फैलावर,

दोषी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची केली मागणी; ससून रुग्णालय अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे
ravindra dangekar
ravindra dangekarsakal

पुणे - ससून रुग्णालयातून आरोपी पळून जाण्याच्या प्रकाराबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. धंगेकर यांनी दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत विचारलेल्या प्रश्नावर ससूनचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

ससून रुग्णालयात मागील 9 महिने उपचार घेत असलेला आरोपी ललित पाटील याने मोठ्या प्रमाणत अंमली पदार्थ विकण्याचा प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यानंतर ललित पाटील याने काही दिवसांपूर्वी पोलिसांना चकवा देत ससून रुग्णालयातून धूम ठोकली होती. या प्रकरणी राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. पोलिस प्रशासनाने संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, तर ससून रुग्णालयात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी भेट देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, आमदार रवींद्र धंगेकर यांनी या सर्व प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी ससून रुग्णालयात भेट दिली. त्यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने काय कारवाई केली ? पाटील 9 महिने उपचार घेत होता, त्याला कुठले आजार होते आणि कोणते उपचार केले गेले ? दोषी डॉक्टर विरुद्ध गुन्हे दाखल का केला नाही,

ravindra dangekar
Chh. Sambhaji Nagar : पाणीसंकटांची मालिका संपेना

चौकशी समितीच्या अहवालात काय माहिती देण्यात आली आहे ? यांसारख्या प्रश्नांची डॉ.ठाकूर यांच्यावर सरबत्ती केली. त्यावेळी डॉ. ठाकूर यांनी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तसेच रुग्णावर कुठले उपचार सुरू आहेत, याबाबत कायद्याने माहिती देता येऊ शकत नाही, असे सांगितले. डॉ.ठाकूर यांच्या अशा उडवाउडवीच्या उत्तराने धंगेकर संतापले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्या दोषी डॉक्टर विरुध्द गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ravindra dangekar
Pune News : विशेष तपास पथकामार्फत ‘ससून’मधील गैरप्रकाराची चौकशी करा - विजय वडेट्टीवार

धंगेकर म्हणाले, " पुण्यात 4 लाखा पेक्षा जास्त रुग्ण आहेत, त्यांच्यासह बाहेरील रुग्ण ससूनमध्ये उपचार घेण्यासाठी येतात. सरकार कोट्यवधी रुपये इथे खर्च करते, त्यामुळे इथे चांगले उपचार मिळणे अपेक्षित आहे.मात्र इथे गुन्हेगारांना व्हीआयपी उपचार मिळतात, सर्वसामान्य रुग्णांना त्रास दिला जातो, हे सगळ्यांना माहिती होते. ललित पाटील सारखा गुन्हेगार 9 महिने इथे उपचार घेतो. इतर आजार असणाऱ्या ऋग्नाणां तत्काळ सोडले जाते, मग पाटीलवर नेमके कुठले उपचार केले ? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. म्हणूनच दोषी डॉकटर वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच हा सर्व प्रकार गंभीर असून त्याविरुद्ध अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे."

ravindra dangekar
Maratha Reservation : 'आपला दणका लय अवघड असतो, मग सुट्टी नाय...!' भुजबळांच्या येवल्यात जावून जरांगेंचा हल्ला

"या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती, त्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला आहे. विभागीय आयुक्तांना अहवाल दिला आहे.सध्या हे प्रकरण संबंधित न्यायप्रविष्ठ आहे. त्याविषयी अधिक बोलणे योग्य राहणार नाही, रुग्णावरील वैद्यकीय उपचाराबाबत कायद्याने माहिती देता येत नाही." डॉ.संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com