
MPSC करणारे विद्यार्थी पुन्हा उतरणार रस्त्यावर; काय आहे प्रकरण?
एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याबाबत आयोगाने अंबलबजावणी केली नाही म्हणून विद्यार्थी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील टिळक चौकात नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी देखील सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांच्या मागील आंदोलनावेळी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू होईल असं जाहीर केलं होतं. मात्र मात्र याची अंबलबजावणी आणि ठोस भूमिका आयोगाने घेतली नाही यामुळे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांची दखल घेत कॅबिनेट मध्ये नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू होईल असा निर्णय झाला होता मात्र याची अंबलबजावणी आणि ठोस भूमिका आयोगाने घेतली नाही. राज्य सरकारने आम्हाला फक्त आश्वासन देत आहे. काही दिवसांपूर्वी आंदोलन करून सरकारने मागण्या मान्य केल्या. पण फक्त त्यात आश्वासन होत बाकी काहीच नाही. त्यामुळे जर सरकारने मागण्या मान्य नाही झाल्या किंवा आम्हाला वेळ वाढवून नाही दिला तर आम्ही सर्व महाराष्ट्रात आंदोलन करू असा इशारा विद्यार्थीनी आज दिला आहे.