थकबाकी वसुलीसाठी महावितरणची मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पुणे - पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या "मोहीम शून्य थकबाकी'ला सुरवात झाली. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे व मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे एक हजार जनमित्रांनी थकबाकी वसुलीचा निर्धार केला. 

सेनापती बापट मार्गावरील प्रकाश भवनात मोहिमेपूर्वी जमलेल्या जनमित्रांशी ताकसांडे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुली ही प्रत्येकाची सर्वोच्च जबाबदारी असली पाहिजे. जनमित्र हे महावितरणचे आधारस्तंभ आहेत व सैनिक आहेत; मात्र आता महावितरणच्या अस्तित्वासाठी थकबाकीविरोधात लढा देण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी कर्तव्यनिष्ठेने थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एक तर थकीत वीजबिल ताबडतोब भरा. अन्यथा अंधारात राहा, असा प्रत्ययच थकबाकीदारांना द्यावा,'' 

पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्‍यात सद्यःस्थितीत 7 लाख 88 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 174 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत मोहीम शून्य थकबाकीच्या माध्यमातून विशेष वीजतोड मोहीम राबविण्यात येणार आहे. वीज ग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे, हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. 

थकीत बिल भरण्यासाठी 
थकीत वीजबिलांचा भरणा केला नाही, तर संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केद्रांसह व घरबसल्या "ऑनलाइन' पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाइट तसेच मोबाईल ऍपचा पर्याय उपलब्ध आहे. 

Web Title: pune news MSEB Campaign for outstanding recovery