वीजमीटरचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे - बांधकाम व्यावसायिकांना व्यावसायिक दराने बांधकामासाठी मीटर घ्यावे लागते; परंतु सदनिकाधारकांना द्यावयाचे मीटरच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश बांधकामांच्या साइट्‌सवर सदनिकाधारकांना बांधकामाच्या मीटरद्वारेच वीजपुरवठा करावा लागत असून, त्याचा भुर्दंड बांधकाम व्यावसायिकांना सोसावा लागत आहे. रीतसर पैसे भरूनही नवे मीटर मिळत नसल्याने ठेकेदारासह बांधकाम व्यावसायिकांना सदनिकाधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र, मीटरचा तुटवडा नसल्याचा दावा महावितरण करत आहे. 

वाघोली, हडपसर, मांजरी, फुरसुंगी, तळेगाव, कान्हेफाटा अशा अनेक ठिकाणी विशेषतः उपनगरांमध्ये गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. शंभर, पाचशे फ्लॅट्‌सच्या (सदनिका) स्कीम्स सुरू आहेत; पण मीटर मिळत नसल्याने सदनिकाधारकांना ताबा (पझेशन) देता येत नाही. बहुतांश वेळेला भाडेतत्त्वाने राहणारे नागरिक सदनिकेचा ताबा लवकर मिळावा म्हणून बांधकाम व्यावसायिकांकडे विचारणा करतात; परंतु मीटर उपलब्ध न झाल्याने ताबा देणेही मुश्‍कील होऊन बसते. मीटर असेल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. लिफ्टही बंद राहते. सदनिकेनुसार वन फेज व थ्री फेजचे मीटर बसविले नसल्याने ग्राहकांना सेवासुविधा देता येऊ शकत नाही, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. 

जर सदनिकाधारकांना ताबा दिला तर व्यावसायिक दराने घेतलेल्या मीटरद्वारे वीजपुरवठा करावा लागतोय. शहराच्या बाहेर अनेक ठिकाणी मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहू लागले आहेत; पण जर शंभर फ्लॅट्‌सची स्कीम असेल, तर मागणी केल्यावर दहा, वीसच्या पटीत मीटर मिळतात. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून हीच परिस्थिती असल्याची तक्रार ठेकेदारांची आहे. वाघोलीसारख्या ठिकाणी तर अडीच हजार सदनिकांना वन फेज, थ्री फेजचे मीटर बसवायचे आहेत. नव्या मीटरसाठी कोटेशन भरून द्यावे लागते; पण महावितरणकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकही कंटाळले आहेत. पूर्वी एका आठवड्यात मीटर मिळत होते, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. 

दोन-तीन महिन्यांपूर्वी मीटरच्या तुटवड्याचा प्रश्‍न होता. मात्र, सध्या मीटरच्या तुटवड्याचा प्रश्‍न नाही. कारण, आजमितीला महावितरणकडे दहा हजार मीटर उपलब्ध आहेत. 
- एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल 

Web Title: pune news mseb electric meter