"ऑनलाइन' वीजबिल भरणाऱ्या ग्राहकसंख्येत 60 हजारांनी वाढ 

"ऑनलाइन' वीजबिल भरणाऱ्या ग्राहकसंख्येत 60 हजारांनी वाढ 

पुणे - महावितरणच्या वीजबिलांचा "ऑनलाइन' भरणा करण्यासाठी ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत पुणे परिमंडलाअंतर्गत ऑनलाइन बिल भरणाऱ्यांमध्ये 60 हजार 607 वीजग्राहक वाढले आहेत. 

नोव्हेंबर महिन्यात सात लाख 23 हजार 409 वीजग्राहकांनी मोबाईल ऍप व वेबसाइटच्या माध्यमातून 129 कोटी 44 लाख रुपयांची वीजबिले घरबसल्या ऑनलाइनद्वारे भरली आहेत. 

वीजबिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा "ऑनलाइन' वीजबिल भरण्यास ग्राहकही पसंती दर्शवू लागले आहेत. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल ऍपद्वारे ग्राहकांना वीजबिल भरता येते. ऑगस्टमध्ये सहा लाख 62 हजार वीजग्राहकांनी "ऑनलाइन' वीजबिल भरणा केला होता. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत नोव्हेंबरपर्यंत या संख्येत 60 हजार 607 वीजग्राहकांची भर पडली. पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी-चिंचवडसह हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्‍यातील ग्राहकांनी वीजबिल भरणा केला आहे. 

बुधवारी तक्रारनिवारण दिन 
महावितरणच्या पुणे परिमंडलाअंतर्गत सर्व विभागीय कार्यालयांत बुधवारी (ता. 6) वीजग्राहक तक्रार निवारण दिन आयोजिला आहे. वीजबिल, नवीन कनेक्‍शन आणि विजेसंबंधीच्या तक्रारी त्वरित निकाली काढण्यात येतील. रास्ता पेठ, पद्मावती, नगर रस्ता, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर, मंचर, राजगुरुनगर, मुळशी येथील कार्यालयांत सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेदरम्यान कार्यकारी अभियंता ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारतील, असे महावितरणने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com