शिवसृष्टीसाठी महापालिका सकारात्मक - टिळक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पुणे - कोथरूडमध्ये शिवसृष्टी साकारण्याबाबत कोणाचेही दुमत नाही, त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मेट्रोसह शिवसृष्टी कशी साकार करायची, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शुक्रवारी दिली. याबाबत महापालिका सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

या सभेपूर्वी नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. त्यानंतर सभेचे कामकाज सुरळीत पार पडले. महापौर म्हणाल्या, ""शिवसृष्टीबाबत महापालिका, बहुतांश सदस्यही सकारात्मक आहेत. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे शिवसृष्टीबाबत कोणाचेही दुमत नाही. याबाबत पालकमंत्र्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, कॉंग्रेस, शिवसेना, मनसेच्या नेत्यांना आमंत्रित करून बैठक घेऊ. त्यात महामेट्रो आणि महापालिकेचेही अधिकारी असतील. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ.'' 

दरम्यान, शिवसृष्टीच्या विशेष सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जय्यत तयारी केली होती. महापालिकेत शक्तिप्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस होता. तसेच, विविध पक्षांतील नगरसेवकांशीही त्यांनी संपर्क साधला होता. त्याची कुणकुण भाजपला लागली, त्यामुळे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अजित पवार आणि दीपक मानकर यांच्याशी संवाद साधला. शिवसृष्टी करण्यासाठी राज्य सरकार तयार असून, त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, विषय ताणू नका सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर महापौरांनीही मानकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी मानकर यांनीही सहमती दर्शविली. शुक्रवारी सकाळीही भाजपचे काही नेते मानकर यांच्या संपर्कात होते. शिवसृष्टी होणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरळीत पार पडले. 

Web Title: pune news mukta tilak