महापालिकेच्या शाळा होणार डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे - शाळेत प्रवेश घ्यायचा म्हटलं, की बहुतांश पालकांचा कल खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असतो. लाखो रुपये देणगी देण्याची तयारी असूनही प्रवेशासाठी धडपड सुरू असते; मात्र आता महापालिकेच्या शाळांनी कात टाकण्यास सुरवात केली आहे. पालिकेच्या सर्व शाळा डिजिटल होणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्प्यात येत्या जून महिन्यापासून शंभर शाळांमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प पालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येईल.

असा आहे ई-लर्निंग प्रकल्प 
    ई-लर्निंग म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांद्वारे शिक्षण
    व्हर्च्युअल क्‍लासरूम
    ८६१ डिजिटल क्‍लासरूम
    प्रत्येक शाळेला इंटरनेट सुविधा
    संपूर्ण शाळा व्यवस्थापनाचे संगणकीकरण
    शिक्षण मंडळाच्या इमारतीमधील मुख्य नियंत्रण कक्षाशी सर्व शाळा जोडणार
    विद्यार्थ्यांना मोबाईलवरही अभ्यासक्रमाचा कंटेन्ट उपलब्ध 
    पालकांनाही मिळणार ॲलर्ट 

Web Title: pune news municipal school digital