महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी पटनोंदणी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे - गुढीपाडव्याच्या निमित्ताने महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटनोंदणी मोहीम व शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रवेशोत्सव साजरा करताना शाळेत येणाऱ्या पालकांना व विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 

सर्व शाळांमध्ये झेंडूच्या फुलांचा वापर करून सजावट करण्यात आली होती. तसेच पुस्तकाची गुढीही उभारण्यात आली होती. प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व शिक्षकांनी जवळच्या वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन पालकांचे प्रबोधन केले व नवीन विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून येत्या शैक्षणिक वर्षाची सुरवात केली. धनकवडी, सहकारनगर, कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, रामटेकडी विभागातील सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर व पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांना पटनोंदणी मोहीमेसाठी प्रोत्साहन दिले. शेंडकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या शाळांमध्ये मिळणाऱ्या उत्तम भौतिक सुविधा, गुणवत्ताधारक शिक्षक, विद्यार्थ्याचा दर्जा, मोफत शैक्षणिक साहित्य, विद्यार्थी वाहतुकीसाठी उपलब्ध होणारी मोफत वाहनांची सोय, संगणक व ई-लर्निंगची सुविधा, सीसीटीव्हीयुक्त सुरक्षित इमारती याबद्दलची माहिती पालकांना देण्यात आली.’’

Web Title: pune news municipal school student counting campaign