प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे - प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाचा धारदार रॅम्बो सुऱ्याने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तिघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

सुरजित आलासिंग कल्याणी (वय २४, शिवतेजनगर, बिबवेवाडी), आकाश मल्लेश गायगोळे (वय १९, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड) आणि रितेश श्रीराम बलीपाठक (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) अशी या तिघांची नावे आहेत. गुलाम बागवान (रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याचा पोलिस शोध घेत आहेत. सनी विलास शिंदे (वय २०, रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्‍वर) याच्या खूनप्रकरणी त्याचा मावसभाऊ आकाश राजू शिंदे (वय २१, रा. धायरी गाव) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे यांचा मावसभाऊ सनी शिंदे याच्या प्रेयसीची आकाश गायगोळे आणि बलीपाठक यांनी छेड काढली. त्यानंतर सनी त्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता तिघांनी त्याला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच सुरजित कल्याणी याने दडवून आणलेल्या रॅम्बो सुऱ्याने वार करून खून केला. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गेट क्रमांक १ येथील बसस्टॉपजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केलेली पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने मंजूर केली.

Web Title: pune news murder