राष्ट्रीयीकृत बॅंका ३१ मार्चला दिवसभर राहणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

पुणे - येत्या शनिवारी ३१ मार्चला महिन्याचा पाचवा शनिवार असून, ग्राहकांच्या सोयीकरिता दिवसभर राष्ट्रीयीकृत बॅंका सुरू राहणार आहेत.  

महावीर जयंती (ता. २९) आणि गुड फ्रायडे (ता. ३०) आहे. या दिवशी सुटी आहे तर शनिवारी (ता. ३१) हनुमान जयंती असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी राष्ट्रीयीकृत बॅंका सुरू राहतील. एक एप्रिलला बॅंकांना सुटी आहे याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: pune news nationalise bank open