राष्ट्रवादीकडून ‘हल्लाबोल’ची तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे मोर्चेबांधणी करत आहेत. त्यासाठी येत्या गुरुवारी (ता. २९) पुण्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 

राज्यातील विविध भागातील आंदोलनांनंतर पक्षाच्या वतीने येत्या २ एप्रिलपासून कोल्हापुरातून पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लोबोल आंदोलनाला सुरवात होईल. त्यानंतर सांगली, सोलापूर, साताऱ्याहून दहा एप्रिलला आंदोलनकर्ते पुणे जिल्ह्यात दाखल होतील. त्यात शिरूर, जुन्नर, खेड, भोसरी, मावळ, चिंचवड, दौंड व पुरंदरमध्ये पक्षाच्या नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर ११ एप्रिलला पुणे शहरातील हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांच्या सभा होतील. पुणे जिल्हा आणि शहरात आंदोलनाला पाठिंबा मिळविण्यासाठी पक्ष संघटनेच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासल्यातील सभेकडे पक्षाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. येथील सभेला लोकांची गर्दी व्हावी, यासाठी सुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.

बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी प्रयत्न
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत पुणे जिल्हा आणि शहरात भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोलच्या निमित्ताने मोर्चेबांधणी केली आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात होणाऱ्या बैठकीत आंदोलनाचे नियोजन करण्यात येणार आहे.

Web Title: pune news ncp hallabol preparation politics