नवे पार्किंग धोरण म्हणजे भाजपचा दुटप्पीपणा - तुपे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केलेले पार्किंग धोरण म्हणजे भाजपचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे.

पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केलेले पार्किंग धोरण म्हणजे भाजपचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे.

"पार्किंग धोरण जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञ आणि नागरिकांची मते जाणून त्यावर व्यापक चर्चा करणे गरजेचे होते. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच, असे भाजपचे धोरण आहे. हा निर्णय पुणेकरांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही,' अशी प्रतिक्रिया तुपे यांनी व्यक्त केली.

"पार्किंग धोरण आवश्‍यक आहे. परंतु ते नागरिकांना सोयीस्कर असावे,' अशी मध्यममार्गी भूमिका उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी घेतली. "जुने वाडे आणि झोपडपट्टी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे पार्किंगची सुविधा नाही. त्यांना रात्री पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात यावे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

- प्रशासनाच्या प्रस्तावित दरापेक्षा 80 टक्‍के कपात केल्याचा स्थायीचा दावा
- पार्किंग झोनसाठी शहरातील 1800 किलोमीटरचे सर्वेक्षण होणार
- पोलिसांच्या अधिसूचनेनंतर पार्किंग झोन निश्‍चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी
- रात्री दहा ते आठपर्यंत पार्किंगसाठी वेगळे दर, हे शुल्क महापालिका वसूल करणार
- दिल्ली, मुंबई आणि नागपूर येथील पार्किंगच्या तुलनेत दर कमी असल्याचा दावा
- स्थायी समितीमध्ये दहा विरुद्ध चार मताने प्रस्ताव मंजूर

Web Title: pune news new parking policy bjp chetan tupe