गायन, वादनातून अभिजात संगीताचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पुणे - भरतनाट्यम नृत्यांगना अलारमेल वल्लींचे बहारदार नृत्य आणि त्यानंतर गायक जयतीर्थ मेवुंडी आणि बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जुगलबंदीने श्रोत्यांची सायंकाळ अविस्मरणीय बनली.

भैरवी संगीत प्रसारक मंडळ आयोजित ‘नूपुरनाद महोत्सवा’त हा कलाविष्कार श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. महोत्सवाची सुरवात अलारमेल वल्ली यांच्या नृत्याने झाली. निसर्गाची विविध रूपे त्यांनी नृत्यातून उलगडली. ‘संगम’ या प्राचीन तमीळ काव्यावर कथा साकारत त्यांनी त्यातली पात्रेही उभी केली. वसुधा रवी (गायन), सी. के. वासुदेवम, शक्तिवेध मुरुंगधम (मृदंग), के. पी. नंदिनी (व्हायोलिन) यांनी त्यांना साथ केली. 

त्यानंतर जयतीर्थ मेवुंडी आणि प्रवीण गोडखिंडी यांच्यात जुगलबंदी रंगत गेली. गायन आणि वादन अशी जुगलबंदी श्रोत्यांना परमोच्च आनंदाची अनुभूती देऊन गेली. मारूबिहाग राग खुलवत त्यांनी मने जिंकली. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके, तानपुऱ्यावर रामेश्‍वर डांगे यांनी, तर हार्मोनिअमवर राहुल गोळे यांनी साथ केली. या वेळी मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ, कौशिक प्रदीप मराठे, डॉ. धनंजय दैठणकर, डॉ. स्वाती दैठणकर, नंदकुमार वढावकर उपस्थित होते. 

छेडल्या हृदयाच्या तारा
नूपुरनाद महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात राहुल शर्मा यांचे संतूरवादन आणि पंडित व्यंकटेशकुमार यांचे गायन रंगले. कौशीध्वनीमधील धून सादर होताना राहुल शर्मा यांना श्रोत्यांची दाद मिळाली. सत्यजित तळवलकर (तबला) यांनी साथ केली. त्यानंतर व्यंकटेशकुमार यांच्या सुमधुर गायनाची श्रोत्यांनी अनुभूती घेतली. वेगवेगळ्या रचनांनंतर ‘आजा सावरिया...’ ही भैरवी सादर करत त्यांनी महोत्सवाची सांगता केली. प्रशांत पांडव (तबला), शिवराज पाटील, निवृत्ती धाबेकर (तानपुरा), राहुल गोळे (हार्मोनिअम) यांनी साथ केली. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: pune news nupurnad mahotsav