महिलांना अश्‍लील संदेश पाठवणारा गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पुणे - फेसबुक अकाउंटवर मैत्रीण असल्याचे भासवून महिलांना अश्‍लील संदेश आणि छायाचित्र पाठविणाऱ्या तरुणाला सायबर गुन्हे शाखेने अटक केली. 

संदीप हरिबा घोलपे (रा. कारेवाडी, ता. उदगीर, जि. लातूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप घोलपे हा महिलांना फेसबुक आणि व्हॉटसऍपवर मैत्रीण असल्याचे भासवून बनावट नावाने चॅटिंग करीत असे. फेसबुक अकाउंट हॅक करून महिलांकडून व्हेरिफिकेशन कोड प्राप्त करून त्यावर अश्‍लील छायाचित्रे पाठवीत होता. 

याप्रकरणी पाच महिलांनी सायबर गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला होता. पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपीचा छडा लावला. त्याला पुढील तपासासाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याचा शहरातील विविध भागातील गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध अलंकार पोलिस ठाणे, सिंहगड रस्ता, चतु:शृंगी, मुंढवा आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

व्हेरिफिकेशन कोड देऊ नका 
महिलांनी फेसबुक अकाउंट आणि व्हॉटसऍपचे व्हेरिफिकेशन कोड कोणालाही देऊ नये. तसेच असा प्रकार लक्षात आल्यास सायबर गुन्हे शाखा अथवा नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.

Web Title: pune news obscene messages to women