जुनी सांगवीत सांगितिक गुरूपुजन साेहळा संपन्न*

रमेश मोरे
रविवार, 27 ऑगस्ट 2017

कार्यक्रमाची सांगता पं सुधाकर चव्हाण यांच्या बहारदार गायनाने झाली.

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील स्व. शकुंतला नारायण ढोरे स्मृती प्रतिष्ठान व राधानंद संगीत विद्यालय, सांगवी, पुणे आयोजित गुरुपूजन सोहळा, पं. भीमसेन जोशी कलामंदिर औंध पुणे येथे दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री नंदकिशोर ढोरे संचलित राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध तालांमध्ये घराणेबाज व सुश्राव्य असे तबलावादन झाले.

या गुरूपूजन कार्यक्रमात प्रमुख अतिथींचे गुरुपूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, जेष्ठ तबलावादक पं सुनील देशपांडे, कलाश्रीचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण, पं धनंजय वसवे, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर व कार्यक्रमाचे आयोजक नंदकिशोर ढोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता पं सुधाकर चव्हाण यांच्या बहारदार गायनाने झाली. त्यांनी राग मारू बिहाग मध्ये “रसिया आओ, ना जाओ” व “कैसे कैसे जाऊ मथुरा नगरी” या बंदिशींचे बहारदार सादरीकरण केले. त्यांनी त्यानंतर भैरवी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना तबल्यासाठी नंदकिशोर ढोरे, संवादिनीवर पं. प्रभाकर पांडव, पखवाजावर ह.भ.प. गंभीर महाराज अवचार यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले.

Web Title: pune news old sangvi guru pujan function