देवेन शहा यांच्या खूनप्रकरणी एका हल्लेखोराला अटक 

अनिल सावळे
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे - डेक्‍कन परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा (वय 55, रा. सायली अपार्टमेंट, प्रभात रस्ता) यांच्यावर गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली. जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा खून झाल्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. मात्र, चौकशीनंतर सर्व बाबी समोर येतील, अशी माहिती अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. 

पुणे - डेक्‍कन परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा (वय 55, रा. सायली अपार्टमेंट, प्रभात रस्ता) यांच्यावर गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली. जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा खून झाल्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. मात्र, चौकशीनंतर सर्व बाबी समोर येतील, अशी माहिती अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. 
रवि सदाशिव चोरगे (वय 41, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला जळगाव येथून अटक करण्यात आल्याची माहिती डेक्कनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी दिली. दुसऱ्या हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.

प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक सातमध्ये देवेन शहा यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. ही घटना शनिवारी (ता. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. हल्लेखोरांनी शहा यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांचा मुलगा अतित शहा (वय 29) यांनी तक्रार दिली. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या घटनेनंतर पोलिसांनी शहा यांच्या अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हल्लेखोर शहा यांच्यावर गोळ्या झाडत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली होती. मात्र, गेल्या सात दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागत नव्हते. डेक्‍कन पोलिसांसह संपूर्ण परिमंडळ एक, तसेच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हल्लेखोरांच्या मागावर होते. हल्लेखोरांना शोधण्यासाठी सहा तपास पथके तयार करण्यात आली होती. मुंबई-पुण्यासह मध्यप्रदेश येथील इंदूर आणि अन्य ठिकाणी ही पथके गेली होती. 

शहा यांचे कमला नेहरू पार्कजवळ अंबिका ग्रुप ऑफ रिअल इस्टेट हे कार्यालय आहे. त्यांनी पौड, शिरवळ, धायरी, कोंढवे-धावडे परिसरात जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत. देवेन यांच्या पत्नीचा शनिवारी वाढदिवस होता. त्यासाठी शहा कुटुंबीय बाणेर येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. ते रात्री पावणेअकराच्या सुमारास घरी परतले. रात्री अकराच्या सुमारास दोन व्यक्ती अपार्टमेंटमध्ये खाली भेटण्यासाठी आल्याचा निरोप त्यांना दिला गेला. ते दोघे खाली आले. त्यावेळी हल्लेखोरांनी शिवीगाळ वरून देवेन यांच्यावर गोळ्या झाडल्या. अतित याने हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला धमकी देत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले होते.

Web Title: pune news one arrested in deven shaha murder case