खुल्या ऑनलाइन फेरीत 93 विद्यार्थ्यांना प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - अकरावी प्रवेशाच्या खुल्या ऑनलाइन फेरीत आज गट क्रमांक एकमधील (80 ते 100 टक्के गुण मिळालेल्या) 93 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यापैकी 55 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेतला आहे. 

उर्वरित 38 विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत जाऊन प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. गट क्रमांक दोनमधील (60 ते 100 टक्के गुण मिळविलेले) विद्यार्थ्यांच्या फेरीसाठी उद्या (ता. 22) सायंकाळी पाच वाजता रिक्त जागांचा तपशील प्रवेशाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. या गटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश 23 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या काळात होतील. खुल्या फेरीमध्ये आरक्षणाचे नियम डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर याबाबत म्हणाले, ""खुल्या फेरीमध्ये "प्रथम अर्ज करणारास प्रथम प्रवेश' या तत्त्वावर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानेच घेतलेला आहे. या आधी झालेल्या पाच फेऱ्यांमध्ये आरक्षणाचे सर्व नियमांचे पालन करून अंमलबजावणी केलेली आहे. परंतु, अकरावीच्या रिक्त राहिलेल्या अधिक जागा आणि उर्वरित विद्यार्थ्यांची कमी संख्या याचा विचार करून प्रवेश प्रक्रिया लवकर संपविण्यासाठी या खुल्या फेरीचे आयोजन केलेले आहे.'' 

Web Title: pune news online admission student