चित्रकला स्पर्धेत एस जे एच गुरुनानक हायस्कूलचे यश

रमेश मोरे
बुधवार, 14 मार्च 2018

यशस्वी विद्यार्थ्याना कलाशिक्षक सौ . प्रियंका लोमटे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . वृषाली पालांडे व तबस्सुम बादशाह यांनी प्रशालेच्या वतीने  त्यांचे अभिनंदन केले .

जुनी सांगवी - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व वनराई व भिडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ता. १२ रोजी आयोजित चित्रकला स्पर्धेत जनता शिक्षण संस्थेच्या एस जे एच गुरुनानक हायस्कूल नवी सांगवी च्या इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला.

यामध्ये १.गाडे अनुजा ( रोख ४००रू बक्षीस व प्रशस्तीपत्र)  2. चौधरी जान्हवी ( रोख ३००रू व प्रशस्तीपत्र)  ३. जगताप भूवन ( रोख २०० व प्रशस्तीपत्र)  
मिळाले .

यशस्वी विद्यार्थ्याना कलाशिक्षक सौ . प्रियंका लोमटे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . वृषाली पालांडे व तबस्सुम बादशाह यांनी प्रशालेच्या वतीने  त्यांचे अभिनंदन केले .

Web Title: pune news: painting competition