पालखी मार्गासाठी केंद्राकडून निधी देऊ - आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘जुन्या पालखी मार्गाच्या कामासाठी (वानवडी वडकी) स्थानिक निधीतून कामे होत असली, तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उभारण्यात येईल. त्यातून या मार्गांवरील भाविकांना आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील, ’’असे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले. 

महापालिकेच्या महंमदवाडी-कौसर या प्रभागस्तरीय निधी या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्‌घाटन आढळराव-पाटील यांच्या हस्ते झाले. स्थानिक नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, विजय देशमुख, तानाजी लोणकर, बाळासाहेब भानगिरे आदी या वेळी उपस्थित होते. या भागातील विविध कामांचे उद्‌घाटनही आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. 

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे. या पुढील काळात पालखी मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी ज्या ज्या सुविधांची आवश्‍यकता असेल, त्या निर्माण केल्या जातील. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या पालखी मार्गाचा नव्याने आराखडा तयार करावा. ज्यात, भाविकांच्या निवासाची सोय असेल.’’

Web Title: pune news palkhi Adhalrao Patil