संतूरवादनातून उलगडले संगीताचे सौंदर्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने श्रोते तल्लीन

पुणे - भारतीय शास्त्रीय संगीत संतूरवर सादर करत या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे ख्यातनाम संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांनी वेगवेगळे राग सादर करत श्रोत्यांना शास्त्रीय संगीतातील सौंदर्याचे दर्शन घडवून दिले. त्यामुळे श्रोते संगीताच्या विश्‍वात तल्लीन झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन रंगले. त्यांना तबलावादक विजय घाटे, दिलीप काळे यांनी समर्पक साथ केली. पं. शर्मा यांनी आपल्या वैशिट्यपूर्ण शैलीमध्ये राग यमनने मैफलीला सुरवात केली. 

सुरवातीला झपताल आणि त्यानंतर एकतालामध्ये सादरीकरण झाले. तबल्याच्या साथीमुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मैफलीच्या उत्तरार्धात उपशास्त्रीय संगीताचा वेगळा अंदाज रसिकांनी वादनातून अनुभवला. कंसध्वनी मिश्र रागातील आणि दादरा तालातील वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

Web Title: pune news pandit shivkumar sharma santurvadan