पानशेत धरणात निम्मा पाणीसाठा जमा

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 14 जुलै 2017

चार धरणातील एकूण पाणीसाठा 
8.99टीएमसी, 30.82 टक्के

खडकवासला : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरण क्षेत्रात तीन- चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. तर पानशेत धरणातील पाणीसाठा निम्मा झाला आहे. 

पानशेत धरणाची एकूण क्षमता 10.65 टीएमसी आहे. या धरणात 24 व 25 जून रोजी पानशेत धरणात 23.60 टक्के पाणीसाठा जमा होता. 2.51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. आज 14 जुलै रोजी हा पाणीसाठा 48.60 टक्के म्हणजे 5.18 टीएमसी झाला आहे. आज सकाळी मागील 24 तासात टेमघर येथे 93, वरसगाव येथे 60, पानशेत येथे 56, खडकवासला येथे 22 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. वरसगाव धरणातील दासवे लवासा धरण येथे 24 तासात 122 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासला धरण साखळीतील सकाळी 6 वाजताची स्थिती 
धरणाचे नाव/ 24 तासातील पाऊस (मिलिमीटर मध्ये)/१जूनपासून चा पाऊस मिमी/धरणसाठा टीएमसी मध्ये / टक्केवारी
टेमघर - 93/1057/ 0.36/9.59
पानशेत - 56/662/ 5.18/48.60                                                                   वरसगाव- 60/686/ 2.96/23.1 
खडकवासला - 22/ 216/ 0.49/ 24.99

चार धरणातील एकूण पाणीसाठा 
8.99टीएमसी, 30.82 टक्के

मागील वर्षीचा आजच्या दिवशीच पाणीसाठा
13.74 टीएमसी,47.14टक्के

Web Title: pune news panshet dam water stock reaches 50 percent