पुण्यात रात्रीचे पार्किंग शुल्क रद्द, सुधारित दर जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

रस्त्यांच्या प्रकारानुसार प्रती तास पार्किंग शुल्क 
- दुचाकी - 2, 3, 4 
- रिक्षा - 6, 9, 12 
- मोटारी - 10, 15, 20 
- मालवाहू टेंपो - 6, 9, 12 
- मिनी बस, एलसीव्ही- 15, 23, 30 
- अवजड वाहन (ट्रक) - 20, 30, 40 
- खासगी प्रवासी बस (15 मीटर लांब) - 30, 45, 60 
(वर नमूद केलेल्या दरांपेक्षा वाहनतळाचे दर कमी ठेवण्यात आले आहेत) 

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आणि शहरात उत्सुकतेचा विषय झालेली पार्किंग पॉलिसी अखेर चर्चेच्या गदारोळात शुक्रवारी रात्री उशीरा मंजूर होण्याची चिन्हे दिसून आली. वर्दळीच्या पाच रस्त्यांवर सुरवातीला प्रायोगिक स्वरूपात राबविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत ठरले. रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान नागरिकांकडून पार्किंग शुल्क न आकारण्याचेही या वेळी ठरले.

"पे अँड पार्क'वर देखरेख करण्यासाठी सर्वपक्षीय समिती नियुक्त करून सहा महिन्यांनी सभागृहाला अहवाल सादर करण्याचे ठरले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेनेने समितीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. 

रस्त्यांच्या प्रकारानुसार प्रती तास पार्किंग शुल्क 
- दुचाकी - 2, 3, 4 
- रिक्षा - 6, 9, 12 
- मोटारी - 10, 15, 20 
- मालवाहू टेंपो - 6, 9, 12 
- मिनी बस, एलसीव्ही- 15, 23, 30 
- अवजड वाहन (ट्रक) - 20, 30, 40 
- खासगी प्रवासी बस (15 मीटर लांब) - 30, 45, 60 
(वर नमूद केलेल्या दरांपेक्षा वाहनतळाचे दर कमी ठेवण्यात आले आहेत) 

Web Title: Pune news parking policy Pune municipal corporation BJP NCP