लोकसहभागातून शहराचा विकास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा नागरिकांना एका ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने पीएमसी केअर प्लॅटफॉर्म आणि गुगल मॅप लोकेशन सर्व्हिसेस (जीआयएस) आणि शिक्षण मंडळाचा ई-लर्निंग प्रकल्प २३ मार्चपासून राबविण्यात येत आहे. नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.
- कुणाल कुमार, आयुक्‍त

पुणे - महापालिकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच विकासकामांमध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांचे नेमके प्रश्‍न आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी पालिकेकडून पीएमसी केअर-२ आणि जीआयएस सिस्टिम ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. उद्यापासून (ता. २३) या उपक्रमांची अंमलबजावणी होईल.

नागरिक, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार
एखादा रस्ता किंवा उड्डाण पूल बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी जुनी पाइपलाइन किंवा ड्रेनेजलाइन कोठे आहे, याची माहिती जीआयएसमुळे मिळणार आहे. एखादे काम सुरू करताना ही माहिती कामी येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्‍तीला नळजोडणी घ्यायची असेल, तर घरापासून पाण्याची पाइपलाइन किती अंतरावर आहे, याची माहिती तातडीने मिळेल. त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. शिवाय, शहरात उद्यान, स्वच्छतागृह, वाय-फायची सुविधा कोठे आहे, ही माहिती या संकेतस्थळावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पीएमसी केअर-२ 
    pmccare.in संकेतस्थळाला भेट द्या
    जन्म-मृत्यू दाखल्यांसह सर्व दाखले मिळणार घरबसल्या  
    मिळकतकर, पाणीपट्टी आदींचा भरणा 
    कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन, नागरिकांच्या वेळेची बचत 
    यापूर्वी पीएमसी केअरच्या माध्यमातून ८० हजार तक्रारी प्राप्त 
    ९७ टक्‍के तक्रारींचे निवारण, त्यापैकी ५८ टक्‍के नागरिकांकडून फीडबॅक

    जीआयएस सिस्टिम gis.pmc.gov.in संकेतस्थळ
    सॅटेलाइटच्या माध्यमातून पालिकेच्या सर्व प्रकल्पांची माहिती उपलब्ध
    पालिकेच्या सर्व विभागाची माहिती मिळणार
    पालिकेचे धोरण, योजनांची माहिती, आकडेवारी आणि घोषणा
    रुग्णालये, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामन या अत्यावश्‍यक सेवांची माहिती
    नागरिकांना विविध विषयांवर त्यांची मते मांडता येतील
    ब्लॉगवर नागरिकांना शहर विकासाच्या मुद्यावर चर्चा करता येणार, गट चर्चेत सहभाग घेता येईल  
    नागरिकांच्या तक्रारी, प्रतिक्रिया आणि चर्चेतून नियोजन करण्यास मदत

Web Title: pune news People participation city development