फार्मसिस्ट सेवा ही रुग्णसेवेचाच एक भाग: विनयकुमार भारती

निलेश कांकरिया
सोमवार, 15 जानेवारी 2018

वाघोली (पुणे): डॉक्टरप्रमाणेच फार्मसिस्ट अन् रुग्णाचे नाते असते. फार्मसिस्ट सेवा ही रुग्णसेवेचाच एक भाग असून त्यांनी निर्भिडपणे व्यवसाय करावा, असे मत दिल्ली येथील फार्मसी क्षेत्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनयकुमार भारती यानी व्यक्त केले.

ग्रीन क्रॅास फाउंडेशन फॅार फार्मसिस्टच्या वतीने राज्यस्तरीय फार्मा स्पंदन व महाफार्मा रतन पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन भालेकर, देवा झिंझाड, अभिषेक अवचार उपस्थीत होते.

भारती पुढे म्हणाले, फार्मसिस्टना व्यवसाय करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. मात्र, त्या अडचणींचे दडपण न घेता त्याला धैर्याने सामोरे जा. ग्रीन क्रॉस फाउंडेशनने फार्मसी क्षेत्रात काम करणार्यांचा गौरव करुन त्यांना उर्जा दिली आहे. संस्थेचे हे कार्य उल्लेखनीय आहे. दोन दिवसीय कार्यक्रमात विविध स्पर्धांचे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी सिन्नर येथील अतुल झळके व नागपूर येथील मृणाली मलघडे यांना महाफार्मा रतन 2017 पुरस्काराने गैारविण्यात आले. तर शिरुर फार्मसी कॉलेजचे डॉ. अमोल शहा यांना यंग अचिवमेंट तर हडपसर फार्मसी कॉलेजचे डॉ. शिरीष अंबावडेकर यांना लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले.

पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत शिरुर कॉलेज ऑफ फार्मसीने प्रथम क्रमांक मिळविला. तर नृत्य स्पर्धेत अर्चना भालेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. सचिन भालेकर यांनी प्रास्ताविक केले. तर अभिजीत अवचार, निशा केसकर व संजना गावडे यांनी सूत्रसंचालन केले.

या प्रसंगी अन्य पुरस्कारांचेही वाटप करण्यात आले. पुरस्कार पुढील प्रमाणे -
1) फार्मा एक्सलंसी अॅवार्ड - रवी कदम, प्रविण देशमुख, संजना गावडे, एैश्वर्या सुतार, निशा केसकर, मिनल धेाटे, सारीका अंबागडे.
2) बेस्ट फार्मासिस्ट अॅवार्ड - विश्वेशर संगमुली, कांचन गावंडे, शितल चंदन, राहुल सेाळुंके, नामदेव मेारे, कल्याणी वाघ, ए. एम. शेख.

Web Title: pune news Pharmacist service is a part of the hospital service: Vinayakumar Bharti