पावसाळी कामांचा पाहणीनंतर स्वतंत्र अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - पावसाळ्याच्या तोंडावर ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची कामे करण्याबाबत वारंवार बजावूनही त्याकडे दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पावसाळी कामांची पाहणी करण्यात येणार असून, त्याचा स्वतंत्र अहवाल तयार केला जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुढील चार दिवसांमध्ये ही पाहणी होईल. 

शहराच्या पूर्व भागात पावसाळ्यात हमखास पाणी शिरत असल्याच्या तक्रारी येत असून, विश्रांतवाडी, खराडी, धानोरी, कळस, चंदननभर आणि आजूबाजूच्या परिसरातील कामांची पाहणी करून आवश्‍यक ती कामे संपविण्यात येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. 

शहर आणि परिसरात सुमारे साडेतीनशे किलोमीटर लांबीचे ओढे, नाले वाहतात. त्यातील निम्म्याहून अधिक ओढे आणि नाल्यांची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे अपेक्षित होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही कामे झाली नव्हती. महापौर मुक्‍ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ओढे, नाले आणि पावसाळी गटारांची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित खात्याला केली होती. त्यानंतरही अनेक भागांतील नाल्यांची दुरुस्ती झाली नसल्याचे पाहणीतून आढळून आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये वेगाने सुरू असल्याचा दावा, महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर ही कामे ज्या पद्धतीने होणे अपेक्षित होते, तशी झाली आहेत का? याची पाहणी करण्यात येणार आहे. ज्या भागातील कामे झाली नाहीत, तेथील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

Web Title: pune news pmc