37 लाखांचा खर्च गुपचूप मंजूर 

37 लाखांचा खर्च गुपचूप मंजूर 

पुणे - महापौर चषक स्पर्धेअंतर्गत यंदा घेतलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी सुमारे 37 लाख 53 हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र, एवढ्या मोठ्या खर्चाची कुठेही चर्चा होऊ नये, याची काळजी घेत, याबाबतचा प्रस्ताव आयत्या वेळेस स्थायी समितीसमोर दाखल करून तो मंजूर करण्यात आला. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याचा आग्रह असल्यानेच या खर्चाला मंजुरी देण्यात आली. 

महापालिकेतर्फे दरवर्षी महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो. या स्पर्धेत पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता. त्यामुळे या स्पर्धेला महत्त्व देण्यात आले. त्यात, या स्पर्धेची जोरदार प्रसिद्धी व्हावी यासाठी जाहिरातबाजीही करण्यात आली होती. तसेच, स्पर्धेच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रमही झाला. पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी दरपत्रक (कोटेशन) देण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गटांतील खेळाडूंना बक्षिसे, खेळाडूंना राहण्याची व्यवस्था, चहापान, जेवण, स्पर्धेसाठीचा मंडप यांचा समावेश त्यात होता. दरम्यान, या स्पर्धेसाठी होणाऱ्या खर्चाची माहिती जिल्हा संघटनेने 14 सप्टेंबरलाच महापालिकेला दिली होती. तसेच, ही स्पर्धा घेण्याबाबत महापौर कार्यालयाने 25 डिसेंबरला पत्र दिले होते. मात्र स्पर्धेच्या खर्चाची चर्चा होऊ नये आणि त्यावर स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेऊ नये, याकरिता या स्पर्धेच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला. संबंधित पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरल्याने आयत्या वेळेस आलेला हा प्रस्ताव दाखल करून मंजुरी देण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com