11 गावांतील कचऱ्यासाठी महापालिकेचा आराखडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या 11 गावांमधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आराखडा तयार करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी निधी वर्गीकरणाचीही तयारी केली असून, तसा प्रस्ताव लवकरच महापालिका प्रशासन सादर करणार आहे. 

11 गावांसाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येकी 3 कोटी, याप्रमाणे 33 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने सादर करावा, असे सुचविले आहे. त्याप्रमाणे मोठ्या प्रकल्पांवरील अखर्चित राहणाऱ्या निधीतून ही रक्कम गावांच्या विकासाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रशासन तयार करीत आहे. महापौर मुक्ता टिळक यांनीही त्यात लक्ष घातले असून, नियोजनासाठी संबंधित विभागालाही लक्ष देण्यास त्यांनी सांगितले आहे. 

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप म्हणाले, ""या गावांचे नियोजन या पूर्वी जिल्हा परिषदेकडे होते. त्यांच्याकडे कचरा वाहतूक करणाऱ्या लहान गाड्या आहेत. ही वाहने गावांमधील कचरा डेपोपर्यंत वाहून नेऊ शकत नाहीत. महापालिकेची वाहने शहरातील कचरा वाहून नेण्यात गुंतलेली असतात. त्यामुळे नव्याने वाहने उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे सुरवातीच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता वेळापत्रक तयार करण्यात आले असून, या गावांतील कचरा उचलण्यासाठी मोठी वाहने तयार करण्यात येत आहेत. त्यानंतर सर्वच गावांमधून नियमितपणे कचरा उचलला जाईल.''

Web Title: pune news PMC garbage