बेकायदा मांडव उभारणाऱ्या मंडळावर कारवाई होणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पुणे - गणेशोत्सवात बेकायदा मांडव, कमानी त्यासाठी बेकायदा खड्डे खोदलेल्या गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी पाहणी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने बुधवारी दिला. गणेश मंडळाच्या मांडवाबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 

दरम्यान, मांडव आणि कमानींच्या परवानगीसाठी पोलिसांकडे सुमारे 1 हजार 750 मंडळांनी "ऑनलाइन' अर्ज केले असून, त्यापैकी साडेसहाशे मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, महापालिकेने 350 मंडळांना परवानगी दिली आहे. बेकायदा मांडव उभारलेल्या 140 मंडळांना महापालिकेने नोटिसा बजाविल्या आहेत. 

गणेशोत्सवासाठी मंडळांकडून मांडव आणि कमानी (जाहिरात) उभारण्यात आल्या आहेत. त्याच्या परवानगीसाठी बहुतेक मंडळांनी महापालिका आणि पोलिसांकडे अर्ज केले आहे; परंतु काही मंडळांनी परवानगीपेक्षा अधिक कमानी उभारल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, या कमानींसाठी बेकायदा खड्डेही खोदण्यात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. पार्श्‍वभूमीवर ज्या मंडळांनी मांडव आणि कमानीसाठी परवानी घेतली नाही. त्याची पाहणी करून संबंधित मंडळांना नोटिसा देण्याची सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी केली आहे. त्यानुसार शहरातील विविध भागातील मंडळांची पाहणी करून, त्यांना नोटिसा देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

बेकायदा स्टॉलवर कारवाई 
गणेशोत्सवात शहरातील बहुतांश रस्त्यांवर नागरिकांची गर्दी असते. त्यातच, रस्त्यांवरील मांडव आणि कमानींमुळे वाहतुकीला अडथळा होण्याची शक्‍यता असते. अशा परिस्थितीत रस्त्यांवर बेकायदा स्टॉल उभारले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात बेकायदा स्टॉल, हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले. 

Web Title: pune news pmc mandap