महापालिकेची आता ‘व्हॉल्व्हमन’वर नजर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

पुणे - यंत्रणेत दोष निर्माण करून विशिष्ट परिसराचा पाणीपुरवठा विस्कळित करणाऱ्या ‘व्हॉल्व्हमन’वर महापालिकेच्या पथकाची नजर राहणार आहे.

एखाद्या भागाच्या पाणीपुरवठ्यात जाणीवपूर्वक फेरबदल करणाऱ्या ‘व्हॉल्व्हमन’वर आता निलंबनाची कारवाई होणार आहे. या संदर्भातील नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाहीचा आदेश महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. 

पुणे - यंत्रणेत दोष निर्माण करून विशिष्ट परिसराचा पाणीपुरवठा विस्कळित करणाऱ्या ‘व्हॉल्व्हमन’वर महापालिकेच्या पथकाची नजर राहणार आहे.

एखाद्या भागाच्या पाणीपुरवठ्यात जाणीवपूर्वक फेरबदल करणाऱ्या ‘व्हॉल्व्हमन’वर आता निलंबनाची कारवाई होणार आहे. या संदर्भातील नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाहीचा आदेश महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. 

‘पैसे घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या केवळ बदल्या करण्याचा उपाय न करता अशा घटना रोखा,’ अशा शब्दांत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना सुनावले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग येण्याची शक्‍यता आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे पाचशे ‘व्हॉल्व्हमन’ नेमण्यात आले आहेत. त्यापैकी शंभर जण महापालिकेचे कर्मचारी आहेत तर, चारशे ‘व्हॉल्व्हमन’ची ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यावर त्या त्या भागातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. त्यानुसार वेळापत्रकानुसार ‘व्हॉल्व्ह’ सुरू करण्याची कामे त्यांच्यामार्फत केली जातात. मात्र हे कर्मचारी पैसे घेऊन विशिष्ट परिसरात जादा पाणी सोडत असल्याच्या घटना घडत असतात. त्यात काही भागात तर लोकप्रतिनिधींच्या सांगण्यानुसारच पाणीपुरवठा केला जातो. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारीही येतात. त्यातच, पुढील दोन महिन्यांनंतर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती असल्याने त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. प्रामुख्याने, पाणी सोडण्याची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून, दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार पाहणी करण्यात येणार आहे.

काही भागांना कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होतो, त्यासाठी व्हॉल्व्हमन हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारी आहेत. ही कामे विशेषतः ठेकेदाराकडील व्हॉल्व्हमन करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या कामांची पाहणी केली जाईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- व्ही. जी. कुलकर्णी,  प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

Web Title: pune news pmc Wolvman