सात गावांमध्ये धावल्या पीएमपीच्या 125 बस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - एसटी बसच्या संपामुळे शहरालगतच्या सात गावांसाठी पीएमपीने मंगळवारी सकाळपासून 125 जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या सुमारे 800 फेऱ्या दिवसभरात झाल्या. 

पुणे - एसटी बसच्या संपामुळे शहरालगतच्या सात गावांसाठी पीएमपीने मंगळवारी सकाळपासून 125 जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या सुमारे 800 फेऱ्या दिवसभरात झाल्या. 

नसरापूर, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, राजगुरुनगर, आळंदी, पौड आणि सासवड या गावांत एसटीची बससेवा आहे. संपामुळे तेथील प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्याची दखल घेऊन पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी 125 जादा बस उपलब्ध करून दिल्या. त्यासाठी आवश्‍यक ते मनुष्यबळाचेही अल्पावधीत नियोजन केले. मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या बस मार्गावर धावल्या. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी सुमारे 800 फेऱ्या केल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. एसटीचा संप मिटेपर्यंत या बस धावणार आहेत.

Web Title: pune news pmp bus