'पीएमआरडीए भवना'च्या कामाला गती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएसाठी जिल्हा प्रशासनाने येरवडा येथील 5 हजार 510 चौ. मी. जागेचे हस्तांतर केले आहे. त्या ठिकाणी भव्य "पीएमआरडीए भवन' बांधण्यात येणार असून, त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी या जागेची पाहणी केली.

सध्या औंध येथील बडोदेराजे सयाजीराव गायकवाड संकुल येथे पीएमआरडीएचे मुख्य कार्यालय 2015 पासून कार्यरत आहे. तसेच पाषाण येथे बांधकाम परवानगी विभागाचे कार्यालय देखील सुरू आहे. भविष्यातील आकृतिबंधानुसार अधिकारी व कर्मचारी वर्ग वाढणार आहे. प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र मध्यवर्ती कार्यालयाची तरतूद पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार, येरवडा येथील सर्व्हे क्रमांक 191 मधील 5 हजार 510 चौ. मी. जागेचा ताबा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गोल्फ क्‍लब रस्त्यावरील विक्रीकर विभागाच्या शेजारी नवीन पीएमआरडीए भवन बांधण्यात येणार आहे. या जागेची पाहणी आज करण्यात आली. या वेळी पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनील वांढेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे, तहसीलदार अर्चना तांबे आणि सल्लागार लोकेश उपस्थित होते.

बारा मजली इमारत
'नियोजित पीएमआरडीए भवनाचे नकाशे तयार करण्यासाठी आणि बांधकाम नियोजनासाठी सल्लागाराची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. नियोजनानुसार पीएमआरडीए भवन बारा मजली प्रशस्त असणार आहे. दुमजली पार्किंग व्यवस्था त्यामध्ये असणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात केली जाईल,''अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

Web Title: pune news pmrda bhavan work