'पीएमआरडीए'च्या विकासाचे नियोजन लोकाभिमुख - गित्ते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

पुणे - 'पुणे महानगर परिक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात नियोजन करताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन विकासाची उद्दिष्टे साध्य करू,'' अशी ग्वाही "पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

पुणे - 'पुणे महानगर परिक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात नियोजन करताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन विकासाची उद्दिष्टे साध्य करू,'' अशी ग्वाही "पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

पीएमआरडीच्या कार्यक्षेत्रात समतोल विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांच्या एका अभ्यासगटाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी तयार केलेला प्रारूप आराखड्याचे सादरीकरण गित्ते यांना नुकतेच केले. पीएमआरडीएच्या सात हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन करताना पुणे जिल्हाही डोळ्यासमोर ठेवावा; तसेच वाहतुकीचा सर्वांकष आराखडा, जमीन, पाणी, ऊर्जा यांची सध्याची उपलब्धता आणि भविष्यातील वाढीव मागणी, वाढती लोकसंख्या आवश्‍यक उद्योग-व्यवसाय आदींचा त्यात समावेश होता. सांडपाणी शुद्ध करणारे प्रकल्पांची संख्या वाढवितानाच सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे. या भागात विद्यापीठे उभारणीस; तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणारे धोरण हवे. आरोग्य सुविधाही मुबलक प्रमाणात हव्यात, असे अभ्यासगटाने सादरीकरणात म्हटले आहे. या गटात शशिकांत लिमये, विनायक केळकर, रमेश राव, हेमंत साठ्ये, ऋतुजा चाफेकर, स्नेहल पिसाळ, विनय हर्डीकर आदींचा समावेश होता. गित्ते यांनी प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या नियोजनाची आणि विकास प्रक्रियेची माहिती दिली.

नागरिकांच्या अभ्यासगटाच्या सूचना
- पीएमआरडीएची 2060मध्ये लोकसंख्या 1 कोटी 75 लाख असेल. त्यामुळे या कार्यक्षेत्रात टप्प्याटप्प्याने 7 महापालिका हव्यात
- रेल्वेद्वारे होणारी मालवाहतूक शहराबाहेरून व्हावी, यासाठी मळवली-तळेगाव-चाकण, मळवली ते उरळी कांचन असा नवा लोहमार्ग निर्माण करावा
- जिल्ह्यातील कचऱ्यापासून घरगुती व वाहनांसाठी गॅस इंधनाच्या प्रकल्पाचे आतापासून नियोजन करावे

Web Title: pune news pmrda development management