पुणे : बिबवेवाडीत पोलिसाकडून गोळीबार; एक जखमी

पांडुरंग सरोदे
गुरुवार, 22 मार्च 2018

गणेश प्रकाश कांबळे (वय 22, रा. 113, बी, 2/अ, सुपर, अप्पर इंदिरानगर) असे या अपघातात जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. तर अशोक विलास ढावरे (वय 25, रा. अप्पर इंदिरानगर) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पुणे : बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर येथे मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याकडील बंदुकीतुन गोळी सुटुन झालेल्या अपघातात मित्र गंभीर जखमी झाला. बंदुकीतील गोळी मित्राच्या पोटाला लागली असल्याने त्यास उपचारासाठी डेक्कन येथील खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

गणेश प्रकाश कांबळे (वय 22, रा. 113, बी, 2/अ, सुपर, अप्पर इंदिरानगर) असे या अपघातात जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. तर अशोक विलास ढावरे (वय 25, रा. अप्पर इंदिरानगर) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ढावरे व कांबळे हे दोघेही मित्र आहेत. गुरुवारी सकाळी ढावरे हे कांबळे यास भेटण्यासाठी अप्पर इंदिरा नगर येथील मारुती मंदिर परिसरात गेले होते. दोघांची चेष्टामस्करी सुरु होती. त्यावेळी पोलिस ढावरे यांच्या बंदुकीतुन अचानक गोळीबार झाला. बंदुकीतील गोळी कांबळे यांच्या पोटाला लागुन पुढे मारुती मंदीराच्या दरवाजाला लागली. गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांना डेक्कन येथील खासगी रुग्णलयात तत्काळ दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

कांबळे यांची प्रकृती स्थिर अहे. ढावरे हे श्रीमंत कोकाटे यांचे बॉडीगार्ड असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Web Title: Pune news police firing in Bibwewadi

टॅग्स