esakal | 'लेप्ट-राईट' या पुस्तकाच्या चौथ्या आवृतीचे प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

'लेप्ट-राईट' या पुस्तकाच्या चौथ्या आवृतीचे प्रकाशन

'लेप्ट-राईट' या पुस्तकाच्या चौथ्या आवृतीचे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणेः पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या 'लेप्ट-राईट' या पुस्तकाच्या चौथ्या आवृतीचे प्रकाशन महाराष्ट्र पोलिस अॅकेडमी महाराष्ट्राचे निवृत पोलिस महासंचालक डॉ. के. के. कश्यप, नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, महाराष्ट्र पो. अॅकॅडमी नाशिकचे उपसंचालक श्रीयुत ठाकूर यांचे हस्ते पोलिस अॅकॅडमी नाशिक येथे नुकतेच झाले.

अशोक इंदलकर हे पोलिस निरीक्षक पदावर सध्या पुणे (ग्रामिण) येथे कार्यरत आहेत. वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंक यातून त्यांनी लिखान केले आहे. पुण्याच्या कॉन्टीनेंटल प्रकाशनाकडून त्यांची दोन पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. महाराष्ट्र पोलिस अॅकेडमी नाशिक येथे घेतलेल्या ट्रेनिंगच्या तसेच 1992-93 दंगलीच्या बंदोबस्ताच्या अनुभवांवर आधारीत 'लेप्ट-राईट' हे पुस्तक असून, पुण्याच्या राजश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशीत केले आहे.

पोलिस उपनिरीक्षकाच्या सन 1992-93च्या बॅचला 25 वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने पोलिस अॅकेडमी नाशिक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचीत्य साधून हा प्रकाशन सोहळा पार पडला.

loading image
go to top