पुणे जिल्ह्यातील 13 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 25 मे 2017

राज्यशासनाच्या अध्यादेशान्वये पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्या पद स्थापना करण्यासाठी जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत.

मंचर : पुणे जिल्ह्यातील तेरा पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील बाबूराव गोडसे, चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष दत्तात्रेय गिरीगोसावी व शिरूरचे पोलिस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे यांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनी याबाबतचे आदेश बुधवारी (ता.24) काढलेले आहेत. नेमणुकीच्या ठिकाणी ताबडतोब रुजू होण्याचे आदेश बिनतारी संदेश यंत्रणेद्‌वारे संबंधितांना देण्यात आले आहेत.

राज्यशासनाच्या अध्यादेशान्वये पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्या पद स्थापना करण्यासाठी जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्याचे हक यांनी नमूद केले आहे.

सध्याचे नेमणुकीचे ठिकाण व बदलीनंतर पदस्थापना झालेले ठिकाण कंसात : पोलिस निरीक्षक दयानंद सदाशिव गावडे, शिरूर पोलिस ठाणे, (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय),
शशिकांत भरत चव्हाण यवत पोलिस ठाणे, (जिल्हा विशेष शाखा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय),
वसंतराव दादासाहेब बाबर जिल्हा विशेष शाखा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, (आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय),
सुनील गोडसे मंचर पोलिस ठाणे, (राजगड पोलिस ठाणे),
संतोष गिरीगोसावी चाकण पोलिस ठाणे, (नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय),
विश्वंभर भीमराव गोल्डे पौंड पोलिस ठाणे, (हवेली पोलिस ठाणे),
मनोजकुमार यादव नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, (चाकण पोलिस ठाणे),
राजेंद्र कुंटे, नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय (शिरूर पोलिस ठाणे),
सुरेश निंबाळकर नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, (पौंड पोलिस ठाणे),
कैलास पुंडलिकराव पिंगळे हवेली पोलिस ठाणे, (दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय),
रामचंद्र शिवाजी जाधव स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, (दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय),
नारायण मोहन सारंगकर राजगड पोलिस ठाणे, (पोलिस अधीक्षक कार्यालय सातारा),
धन्यकुमार चांगदेव गोडसे कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालय, (यवत पोलिस ठाणे)

 

Web Title: pune news police officials transfers in pune district