Pune News: तब्बल ३१ वर्षांनंतर पोलिसांना काढवं लागणार पीएमपीएलचं तिकीट; आता...

Pune Police
Pune Police

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पोलीस कर्मचाऱ्यांना आता पीएमपीएल बसमध्ये तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. यापुढे पोलिसांना पीएमपीएल बस मधून मोफत प्रवास करता येणार नसून याबाबत निर्णय झाला आहे.

Pune Police
"शिंदे-फडणवीस सरकार अस्वस्थ अन्....; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं केलं भाकीत

पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय यांच्या आस्थापनेवरील पोलीस कर्मचाऱ्यांना पीएमपी बसेस मधून विनाटिकीट बस प्रवासाची सुविधा आज पासून बंद करण्यात आली आहे. कोणत्याही महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यासाठी मोफत प्रवास अनुज्ञेय राहणार नाही.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

पुणे, पिंपरी चिंचवड शहरटेल पोलिस खात्यात असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यार्थं परिवहन महामंडळाच्या बसेस मधून देण्यात येत असलेल्या विना तिकीट प्रवासाच्या सुविधेबाबत आज नवीन आदेश काढण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी हे आदेश काढले आहेत.

Pune Police
Babasaheb Purandare: 'खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा 'शिव'भक्त होणे नाही', राज ठाकरेंची भावुक पोस्ट

राज्य सरकारने 1991 मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना बसमधून विना तिकीट प्रवास करण्याची परवानगी दिली होती. मात्र 31 वर्षानंतर ही सेवा आता बंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com