चार लाख बालकांना दो बूँद जिंदगी के... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

पुणे - शहरातील चार लाख बालकांना रविवारी पोलिओचा डोस देण्यात आला. त्यासाठी बस स्थानके, उद्याने, बांधकामाची ठिकाणे, रेल्वे स्थानक अशा वेगवेगळ्या ठिकाणी एक हजार 764 बूथ लावले होते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली. 

शहरात पोलिओ लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांमधील पाच वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींना या अंतर्गत पोलिओचा डोस देण्यात आला. चार लाख 80 हजार 537 बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. त्यापैकी चार लाख सहा हजार बालकांना डोस दिला. वेगवेगळ्या कारणांनी आज पोलिओचा डोस देता न आलेल्या बालकांपर्यंत पोचण्यासाठी दोन हजार 25 स्वतंत्र पथके तयार केली आहेत. पुढील पाच दिवस ही पथके कार्यरत राहतील, असेही त्यांनी सांगितले. 

महापालिकेतर्फे ही मोहीम राबविताना पाच हजार 231 स्वयंसेवक, 292 पर्यवेक्षक, 14 मुख्य पर्यवेक्षक, पुणे महापालिकेचे 180 डॉक्‍टर यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका, अंगणवाडी सेविका, रोटेरियन्स सहभागी झाले होते, असेही डॉ. साबणे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: pune news Polio