सीएनजीचा वापर केल्यास शहर प्रदूषणमुक्त

सीएनजीचा वापर केल्यास शहर प्रदूषणमुक्त

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीमार्फत पुणे शहरात ८५ हजार घरांमध्ये पाइप लाइनद्वारे गॅसचा पुरवठा होत आहे. ५० पंपांवर सीएनजी गॅसची सुविधा आहे. २०१८ अखेरपर्यंत आणखीन १५ पंपांवर सीएनजीची सुविधा सुरू होईल. शहरात एक लाख ७५ हजार गाड्या सीएनजीवर चालत आहेत. शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी वाहनांना सीएनजी किट बसवावे, असे मत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर यांनी व्यक्त केले.

प्रश्‍न (रमेश पडवळ) - पीएनजी, सीएनजी म्हणजे काय? 
पाइप लाइनद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसला ‘पाइप नॅचरल गॅस’ अर्थात ‘पीएनजी’ आणि वाहनांना पुरवठा होणाऱ्याला ‘कॉम्प्रेस नॅचरल गॅस’ म्हणजे ‘सीएनजी’ असे म्हणतात.  

प्रश्‍न (अजय देशपांडे) - कोणत्या भागांत गॅस कनेक्‍शन्स दिली? 
शिवाजीनगर, खराडी, बिबवेवाडी, सहकारनगर, नऱ्हे, धनकवडी, कात्रज, बाणेर, कोथरूड व पाषाणमध्ये पाइपद्वारे गॅसचा पुरवठा होत आहे. दोन लाख घरांपर्यंत कनेक्‍शन देता येऊ शकेल, एवढे नेटवर्क तयार आहे.

प्रश्‍न (उमेश शहा) - गॅसची किंमत किती? 
३५० रुपयांमध्ये पाइप लाइनद्वारे गॅस उपलब्ध आहे. वस्तुतः एका घरापर्यंत पाइप लाइन टाकण्यासाठी कंपनीला २० हजार रुपये खर्च येतो. १२०० रुपये मीटरची किंमत असते. तरीही जनसेवा म्हणून कंपनी ग्राहकांना माफक किमतीत ही सेवा पुरवत आहे. 

प्रश्‍न (सुनील कांबळे) - गॅसची नोंदणी कुठे करायची?  
कंपनीच्या शिवाजीनगर, पिंपरी, कोथरूड, हडपसर येथील कार्यालयांकडे ग्राहक चौकशी करू शकतात. मार्केटिंग एजन्सीमार्फत ग्राहकांकडून कनेक्‍शनसाठी अर्ज भरून घेण्यात येतो. कनेक्‍शनसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट व पाचशे रुपये नोंदणी शुल्क आहे. सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येते. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी www.mngl.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
 
प्रश्‍न (जयदीप लांडगे) - बिलाचे स्वरूप कसे असते?  
वीजबिलाप्रमाणेच घरगुती ग्राहकांना बिल आकारण्यात येते. २४ रुपये प्रति युनिट आकार असतो. मात्र घरगुती गॅसचे बिल १५ युनिटपर्यंत येते. त्यामुळे ग्राहकांना ही सुविधा परवडणारी आहे. पाइप लाइनद्वारे घरगुती गॅस आणि गाड्यांवर सीएनजी किट्‌स बसवून घेतल्यास शहर प्रदूषणमुक्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com