व्यवस्था बदलण्याची ताकद महिलांमध्ये - बोरवणकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पुणे - ‘‘प्रशासकीय व्यवस्थेत महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली बाब आहे. विशेषतः या महिला अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आव्हाने येऊनही, त्या आपले काम प्रामाणिक आणि सक्षमतेने पार पाडत आहेत. म्हणूनच व्यवस्था बदलण्याची ताकद त्यांच्यात निर्माण झाली आहे,’’ असे मत दिल्लीच्या ‘ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’च्या महासंचालक मीरा बोरवणकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’मध्ये मीरा बोरवणकरलिखित व विश्‍वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘लीव्हज्‌ ऑफ लाइफ’  या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी उद्योजक अनू आगा उपस्थित होत्या. पत्रकार सुनंदा मेहता यांनी बोरवणकर व आगा यांची मुलाखत घेतली.

पोलिस प्रशासनात आलेले अनुभव आणि काही महत्त्वाच्या घटना सांगत बोरवणकर यांनी आपले अनुभवविश्व उलगडले. त्या म्हणाल्या, ‘‘मी लहान असताना रस्ताही ओलांडू शकत नव्हते. आता पोलिस अधिकारी होऊन महिला व मुलींसाठी ‘आयकॉन’ ठरले आहे. उच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे कठीण आव्हाने पेलणे शक्‍य होते. महिला अधिकारी संवेदनशील आहेत, तितक्‍याच कणखरही आहेत. सराईत गुन्हेगारांना हाताळणे अवघड असते; तर रागाच्या भरात गुन्हे करणाऱ्यांना हाताळणे तुलनेने सोपे असते.’’

आगा म्हणाल्या, ‘‘मी सध्या ज्या क्षेत्रात आहे, त्यास अन्य पर्याय असते, तरीही मी याच क्षेत्राला प्राधान्य दिले असते.’’ बोरवणकर यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद सायली गोडसे यांनी केला आहे.

Web Title: pune news The power to change the system in women